TOD Marathi

“माझं आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं सविस्तर बोलणं झालेलं आहे. मला विश्वास आहे उद्धव ठाकरे त्याप्रमाणे वागतील आणि छत्रपती घराण्याचा सन्मान करतील,” असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलय. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खलबतं होत असताना सहाव्या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपलं मत व्यक्त केलं. अतिशय मोजक्या मात्र सूचक शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलय.

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर निवडून देण्यासाठी पाठिंबा हवा असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातली होती. त्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांना काल दुपारी 12 वाजेपर्यंत मातोश्रीवर येऊन प्रवेश करण्यासाठी वेळही देण्यात आला होता मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी हा प्रस्ताव नाकारल्याचे बोलले जात होते.

मात्र आज सकाळी संभाजीराजे छत्रपती यांनी जी सुचक प्रतिक्रिया दिली त्यावरून आता संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना पाठिंबा देणार का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.