TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 जुलै 2021 – निसर्ग कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर कोपला आहे. तसेच पूरामुळे अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झालाय. या आपत्तीमध्ये महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या म्हणजे 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरे यांनी साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.

राज्यावर आलेल्या अस्मानी संकट पाहता वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये. तसेच फलक, पोस्टर्स लावू नये. कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला आहे. पूरामुळे मृत्यू झालेत.

अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झालाय. या आपत्तीमध्ये महाराष्ट्र शोकाकुल आहे. कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, सोशल मीडिया आणि ई-मेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

श्रीमंतांच्या पार्टीवर पोलिसांची धाड :
राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलीय. त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नये, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केलीय.