TOD Marathi

दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू होती आणि तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. .
नवाब मलिक यांनी एनसीबीचे तत्कालीन मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. आणि याप्रकरणात आता एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.आज सकाळी नवाब मलिक यांना चौकशीसाठी त्यांच्या घरून ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले.तब्बल आठ तास चाललेल्या ह्या चकाशी नंतर नवाब यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर क्रांती रेडकर यांनी एक टि्वट केलं असून त्यांचा संबध या घटनेशी जोडला जात आहे. क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ अजय देवगण च्या ‘तान्हाजी’ चित्रपटातील ‘माय भवानी’ ह्या गाण्याचा आहे.

दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यानंतर क्रांती रेडकर यांच्या ट्विटवरील त्या व्हिडिओवरही अनेक चर्चासत्र सुरु झाल आहे. भाजपाने सुड घ्यायचा म्हणून ही कारवाई केली असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.
नवाब मलिक यांच्या अटकेवर सोमय्या यांचं वक्तव्य..

किरीट सोमय्या म्हणाले की नवाब मलिकांच्या ईडी (Ed)चैाकशीच्या निष्कर्षाची वाट पाहतो आहे. मलिकांसारखे व्यक्ती मंत्रीमंडळात राहू शकत नाही, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आज मलिक यांची ईडीने चैाकशी सुरु केल्यानंतर शिवसेनेतेच खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ईडी-किरीट सोमय्या’ अशी तीच ट्यून वाजवीत आहेत.पुढे ते अस ही म्हणाले की राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांचे कारस्थान हळूहळू जनतेसमोर येत आहे. आघाडी सरकारमधील सर्व घोटोळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित आहे. मुख्यमंत्र्यांच्या अलिबाग जवळील १९ बंगल्याबाबतची माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे दिली,” अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.