TOD Marathi

रशियाच्या हल्ल्याचा युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार करायला सुरुवात केली आहे. युक्रेनच्या इतर शहरांमध्येही विमानतळावर हल्ले झाल्याच्या अनेक बातम्या आणि व्हिडिओ च्या माध्यमातून समोर येत आहेत. तर युक्रेनने १२ हून अधिक रशियन सैनिक मारल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या लष्कराने आतापर्यंत 50 रशियन सैन्याचा खात्मा केला आहे आणि पूर्वेकडील 6 युद्धनौका देखील नष्ट केल्या आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे.बॉम्बस्फोटासाठी अनेक शस्त्रांचा वापर केला जात आहे. यावर युक्रेनने १२ हून जास्त रशियन सैनिक मारल्याचा दावा केला आहे. त्यात म्हटले आहे की, युक्रेनच्या लष्कराने आतापर्यंत ५० रशियन सैन्याचा खात्मा केला आहे आणि पूर्वेकडील ६ युद्धनौका नष्ट केल्या आहेत.

एकीकडे ह्या युद्धाचे आहे थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक निष्पाप नागरिकांना आणि सैनिकांना ह्या युद्धात आपले प्राण गमवावे लागले आहे. अनेक लष्करी जवानांचे आपल्या कुटुंबासोबत चे काही भावनिक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना आपल्याला दिसत आहेत.

सैनिक कुठल्याही देशाचा असो त्याचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या देशाचं रक्षण करणे.अनेक सैनिक देशाचं रक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती देत असतात.सध्या चालू असलेल्या रशिया-युक्रेन या युद्धात देखील अनेक सैनिकांनी आपले प्राणाची आहुती दिली आहे.