नवाब मलिकांची कोठडी वाढली; कोर्टात आरोपपत्र दाखल

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या मंत्री नवाब मलिक यांची चौकशी सुरु आहे. आता न्यायालयानं मलिक यांच्या कोठडीत 20 मे पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळं मलिकांचा कोठडीतील मुक्काम २० मे पर्यंत वाढला आहे.

मलिक यांच्या कोठडी संदर्भात मुंबईतील विशेष पी. एम. एल. ए. न्यायालयात आज ही सुनावणी झाली आहे. ईडीने मलिकांच्या या प्रकरणात 5000 पेक्षा अधिक पानी आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे. मनी लॉंड्रिग प्रकरणात मलिक यांना ईडीनं अटक करण्यात आली आहे. सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.

मंत्री नवाब मलिक यांना यापूर्वी दिलेली त्यांची कोठडी आज संपत असल्यानं त्यांच्या कोठडीत आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मागील सुनावणीवेळी मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टानं त्यांना २२ एप्रिलपर्यंत आणखी चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आजही दिलासा मिळू शकलेला नाही. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Leave Your Comment