TOD Marathi

दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू होती आणि तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. . ईडीने कडून सकाळीच नवाब मलिक यांच्या घरून त्यांना चौकशी साठी नेण्यात आल होत.
नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले .नवाब मलिक यांनी अटक झाल्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे .आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले नवाब मलिक हे दुसरे मंत्री आहेत. नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजार करण्यात येणार आहे. दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचे काही पुरावे समोर आले आहेत अस सांगण्यात येत आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेली जमीन नवाब मलिक यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीने विकत घेतल्याच्या प्रकरणात मलिक यांची ईडी चौकशी सुरू होती.
मात्र नवाब मलिक यांनी त्यांच्यावर केलेले आरोप पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले होते. ईडीकडून शुक्रवारी इकबाल कासकर याला अटक करण्यात आली त्यानंतर नवाब मलिक यांचं एका प्रॉपर्टी खरेदी संदर्भात नाव समोर आल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी मंत्रालयात राष्ट्रवादीची बैठक सुरू असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, राजेश टोपे उपस्थित आहे. नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणी चर्चा सुरु आहे.