TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 22 जुलै 2021 – महाराष्ट्र राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. कोकणातून वाहणाऱ्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. शहरे व गावांत पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झालीय.

अतिवृष्टी व पुराचा धोका लक्षात घेता कोकण रेल्वेकडून रेल्वेगाड्या थांबविल्या आहेत. कोकण रेल्वेने रेल्वेगाड्या तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. चिपळूण ते कामाठे दरम्यान पुराचा धोका लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतलाय.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या मार्गावरील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून दिली आहे.

चिपळून व कामाठे रेल्वे स्थानकांदरम्यान वाहणाऱ्या वशिष्टी नदीच्या पुलाला पाणी लागले आहे. पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालीय.