TOD Marathi

Income Tax Department चे Dainik Bhaskar Group च्या कार्यालयांवर छापे ; करचोरी प्रकरणी केली कारवाई

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 जुलै 2021 – आयकर विभागाने आज दैनिक भास्कर माध्यम समूहाच्या विविध कार्यालयांवर छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या पथकांनी दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर छापे टाकले आहेत. या कार्यालयांची झाडाझडती घेतली जातेय. देशातील प्रसिद्ध माध्यम समूहांपैकी दैनिक भास्कर समूह हा एक आहे.

आयकर विभागाकडून ही कारवाई करचोरी प्रकरणात केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाचा महत्त्वाचा भाग असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, भास्कर समूहाच्या कार्यालयांवर छापेमारी केली जात आहे, या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दैनिक भास्कर समूहाच्या प्रमोटरच्या निवासस्थानांचीही इन्कम टॅक्स विभागाच्या पथकाकडून झाडाझडती घेतली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अर्थात सीबीडीटीने अद्याप या कारवाईबाबत अधिकृत निवेदन जारी केले नाही.

मात्र, दैनिक भास्कर समूहाच्या विविध कार्यालयांची झाडाझडती सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. करचोरी प्रकरणामध्ये ही छापेमारी केल्याचे सांगण्यात येते.

इन्कम टॅक्स विभागाने ही कारवाई करत असताना दैनिक भास्कर समूहाच्या कार्यालयामध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन्स जप्त केलेत. कार्यालयातील कोणालाही बाहेर जाण्यास मज्जाव केल्याचे सूत्रांनी सांगितले.