TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 9 जून 2021 – जगात मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. पण, जगात असेही काही देश आहेत, ज्यांनी या साथीवर यशस्वीरित्या मात केली आहे. ‘हे’ देश स्वतःहून कोरोनामुक्त झाले आहेत, असे अभिमानाने सांगत आहेत. यात भूतान, न्यूझीलंड, चीन, अमेरिका यांचा समावेश होत आहे. जाणून घेऊया, या देशांनी कोरोनावर कसे नियंत्रण मिळविले?.

चीन – प्रथम चीनमधून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असला तरी आता हा देश कोरोनामुक्त झालाय. या देशात केलेल्या लसीकरणामुळे आता मास्क फ्री देश बनलाय. सध्या चीन पर्यटनासाठीही खुला झाला आहे. चीनमधील बहुतेक थीम पार्क, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आता पूर्णपणे उघडलीत.

अमेरिका – अमेरिकेमध्ये काही ठिकाणी, संपूर्ण लसीकरण केल्यामुळे तेथील लोकांना मास्क न घालण्याचा सल्ला दिला आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने एक मोठी घोषणा केली आहे की, ज्या लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे, त्यांनी एकट्याने चालणे, धावणे किंवा दुचाकी चालवताना मास्क घातले नाही तरी चालेल, असे सांगितले आहे.

भूतान – भूतानमधील नागरिकांचे अधिक प्रमाणात लसीकरण केले आहे. लसीकरणाद्वारे कोरोना विरुद्धची लढाई जिंकणारा हा देश आहे. अवघ्या दोन आठवड्यांत प्रौढ जनतेच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण केलं आहे. या देशात सुरूवातीपासून केवळ एकच मृत्यू झाला आहे. या देशात कोरोना अधिक काळ टिकला नाही.

न्यूझीलंड – कोरोनाला न्यूझीलंड या देशाने उत्तम प्रकारे हाताळले आहे. त्यामुळे या देशाचे इतर देशांकडून कौतुक केले जात आहे. पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न यांचे या राष्ट्राने आभार मानून केवळ २६ मृत्यू झाल्याची माहिती दिलीय. त्यासह सरकारच्या कृती आणि निर्णयांमुळे न्यूझीलंड आज मास्क फ्री देश बनलाय.