HC कडून खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द!; ठोठावला 2 लाखांचा दंड, खासदारकी धोक्यात?

टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 जून 2021 – मुंबई उच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून याप्रकरणी त्यांना 2 लाखांचा दंड ठोठावला आहे. यामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. आज दि. 8 जून रोजी सदर दाव्याचा निकाल घोषित केला.

शिवसेना पक्षाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे असल्याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे आहे, असे समोर आल्यामुळे उच्च न्यायालयाने हे प्रमाणपत्र रद्द केले आहे.

या दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण सन्मान करतो. पण, आपण या निकालाविरुद्धात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे, असे नवनीत राणा यांनी सांगितले आहे.

हा घटनेवरील घोटाळा आहे, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवून ‘ते’ जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना 2 लाखाचा दंड ठोठावलाय. तसेच ते खोटे जात प्रमाणपत्र 6 आठवड्याच्या आत शासनाकडे जमा करावे, असे आदेश दिले आहेत.

आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अॅड.सी.एम्.कोरडे, अॅड.प्रमोद पाटील आणि अॅड.सचिन थोरात यांनी बाजू मांडली. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे,

Please follow and like us: