पुणे महापालिकेत ‘या’ उमेदवारांसाठी नोकरीची संधी ; हवे इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण, जागा आहेत 25

टिओडी मराठी, पुणे, दि. 11 जुलै 2021 – चौथी पास असलेल्या उमेदवारांची भरती पुणे महानगरपालिकेकडून केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून ही भरती सफाईसेवक या पदासाठी होणार आहे.

यासाठी पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. यासाठी 25 रिक्त पदांची घोषणा केली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2021 असणार आहे.

सफाई सेवक – एकूण जागा 25 आहेत.
शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
निवड प्रक्रिया – यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत त्यानुसार पात्रतेनुसार मुलाखती घेतल्या जातील.

वेतन – 17,205/- रुपये प्रतिमहिना मिळेल.
या पत्त्यावर अर्ज पाठवा – कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे -05
अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख – 12 जुलै 2021

Please follow and like us: