TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 7 मे 2021 – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशासह राज्यात रुग्ण आणि नातेवाईकांबरोबर सर्वसामान्यांची मोठी परवड होत आहे. एकीकडे बेड, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जाताहेत तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. यावरून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, ”मोदीजी ‘मन की बात न करता काम की बात करा.’

अशा विदारक परिस्थितीवरून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे की,’आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. मात्र, फोनवर बोलतांना त्यांनी केवळ ‘मन की बात’ केली. मात्र, त्याऐवजी कामाचे बोलले असते आणि आमचं ही ऐकले असते तर बरं झालं असतं’.

या दरम्यान, झारखंड राज्यासह देशातील स्थिती खूप बिकट आहे. राज्यात दररोज संसाधनांचा तुटवड्यामुळे करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होतोय. बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे झारखंडमध्ये मोठं संकट निर्माण झालं आहे. हळूहळू परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जाताहेत.

झारखंड सध्या प्रतिदिन ६८० टन ऑक्सिजन निर्माण करतोय. मात्र, त्यांची गरज केवळ ८० टन इतकी आहे. तिथे कन्टेनर्स, सिलेंडर्स आणि वेपराईझर्सचा तुटवडा झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री सोरेन यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याकडे मदत मागितली होती. मात्र, अद्याप मदत मिळालेली नाही.