TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 7 मे 2021 – जगात कोरोनाने थैमान घातले आहे. हाच कोरोना चीन देशातून पसरला असल्यामुळे चीनवर अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र, जग आणि अनेक देश कोरोनाशी लढत असताना चीनने आणखी एक निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा फटका जगाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तो निर्णय म्हणजे, चीनने मालवाहू विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध लादले आहेत. यामुळे भारतापुढे अडचणी वाढल्या आहेत. भारत देश अनेक देशांना लस, औषध पुरवत आहे. मात्र, चीनच्या या निर्णयामुळे त्याचा फटका भारताला आणि अप्रत्यक्ष सूत्रे देशांना बसणार आहे, असे समजत आहे.

भारताकडून औषधांची आयात करणाऱ्या देशांसमोरही समस्या निर्माण झालीय. अमेरिका औषधांसाठी अधिक प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. भारताकडून औषधं आयात करणाऱ्या देशांची संख्या मोठी आहे. मात्र, चीननं कच्च्या मालाचा पुरवठा थांबविला आहे. त्यामुळे भारतातील औषध निर्मितीवर परिणाम होणार आहे. तसेच जगभरात औषधांची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर चीनने सरकारी विमान कंपनी सिचुआन एअरलाईन्सच्या मालवाहू विमानांची उड्डाणं रोखली आहेत. याबद्दल भारतीय औषधं निर्मिती संघाचे अध्यक्ष महेश दोषी यांनी चिंता व्यक्त केलीय.

भारतात तयार होणाऱ्या औषधांसाठीचा ६० ते ७० टक्के कच्चा माल चीन देशातून येतो. त्यामुळे चीननं घेतलेल्या निर्णयाचा परिणाम औषध उत्पादनांवर होऊ शकतो, अशी भीती दोषी यांनी व्यक्त केलीय. यासंदर्भात दोषी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी २९ एप्रिलला पत्र लिहिलंय.