TOD Marathi

टोकीयो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर सकाळी त्यांच्या भाषणादरम्यान गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आले. (Former PM of Japan Shinzo Abe no more)

शिंजो यांच्यावर हा हल्ला झाला तेव्हा ते एका सभेला संबोधित करत होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला झाला. गोळी लागल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचेही सांगण्यात आलं. (He was shot when he was addressing a gathering) हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. हल्लेखोर त्यांच्या कामावर नाराज होता आणि नाराजी असल्याने त्याने हे कृत्ये केले असल्याची माहीती मिळत आहे.

दरम्यान, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या झाल्याने जगात मोठी खळबळ उडाली आहे. शिंजो आबे हे जपानच्या प्रभावशाली राजकीय घराण्यातील व्यक्तीमत्व होते. वयाच्या 52 व्या वर्षी जपानच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड झाली होती.