TOD Marathi

नवी दिल्ली :
टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी आपला ट्विटर विकत घेण्याचा निर्णय आता बदलला आहे. (Elon Musk changed his decision) मस्क यांनी शुक्रवारी सांगितलं की, ट्विटर विकत घेण्यासाठी केलेला 44 अब्ज डॉलर्सचा करार संपवत आहेत. सोशल मीडिया कंपनी बनावट खात्यांची माहिती देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप मस्क यांचा आहे.

मस्क यांनी आपल्या पत्रात म्हटले की, “विलीनीकरण करार संपुष्टात आणत आहे, कारण ट्विटरकडून करारातील अनेक तरतुदींचं भौतिक उल्लंघन केलं जात आहे. “टेस्ला प्रमुखांच्या टीमनं शुक्रवारी ट्विटरला पाठवलेल्या पत्रानुसार. “मस्क दोन महिन्यांपासून जी माहिती मागत आहेत ती माहिती ट्विटरने दिली नाही,” (Twitter didn’t give information, says Musk)

मस्क यांनी आरोप केला आहे की, स्पॅम खात्यांची खरी संख्या खूप जास्त आहे आणि ती 90 टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता आहे. मस्कने यापूर्वीही सांगितलं होतं की, जोपर्यंत कंपनी त्याच्या स्पॅम मेट्रिक्सचा पुरावा देत नाही तोपर्यंत अधिग्रहण पुढे जाऊ शकत नाही. मात्र या गोष्टींची पूर्तता न झाल्यामुळं मस्क यांनी असा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.