TOD Marathi

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक येत निवडून आलेल्या दहा सदस्यांचा शपथविधी समारंभ संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. मध्ये भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे, शिवसेनेचे सचिन अहिर व आमशा पाडवी आणि काँग्रेसचे भाई जगताप या सर्व नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांचा शपथविधी संपन्न झाला. (Oath taking ceremony of new members of Maharashtra Legislative Council)

विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. शपथविधी सोहळयादरम्यान विधान परिषद सदस्यांचे कुटुंबीय, सहकारी आणि विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते.