जम्मू काश्मीर: पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद

Jammu Kashmir- terrorist attack - TOD Marathi

जम्मू काश्मीर: पुंछ भागात आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे ५ जवान शहीद झालेत. सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिलीय.

गुप्त माहितीच्या आधारे भारतीय सैन्याने पुंछ भागात असलेल्या जंगलात ३ ते ४ दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर ही चकमक घडली. सध्या सैन्याने या पूर्ण परिसराची घेराबंदी केलीय. पुंछ जिल्ह्यातील सुरणकोटे भागात डेरा की गली या गावात हे सैन्य अभियान सुरू आहे.

या भागात आणखी दहशतवादी असल्याचा संशय भारतीय सैन्याने व्यक्त केला आहे, त्यानुसार अजूनही या भागात शोध मोहीम सुरू आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सुरणकोट भागात असलेलं डेरा की गली या गावात सैन्य अभियान सुरू आहे.

Please follow and like us: