TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 9 जुलै 2021 – अ‍ॅसिडीटी आहे? , छातीतील जळजळचा अनुभव सर्वांना आला असेल. याची अनेक कारणे आहेत.

सध्याची धावपळीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा, अनहेल्दी फूड, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे अ‍ॅसिडीटी तसेच अपचन होत असते. त्यामुळे पित्त, अपचन, अ‍ॅसिडीटी अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळत असतात.

पण, यावर वारंवार कोणतंही औषधे घेणे काहीवेळा आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. याबाबत डाएट एक्सपर्ट यांनी सांगितलेले हे घरगुती उपाय आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

केळी खा :
केळी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. केळीमध्ये फायबर्स अधिक प्रमाणात आहेत. अन्नपचनासाठी त्याचा अधिक फायदा होतो. केळीमध्ये पोटॅशिअम अधिक असल्याने पोटात अॅसिड तयार होत नाही.

नारळ पाणी प्यावे :
नारळाचे पाणी प्यायल्यास शरीरातील अ‍ॅसिड घटकांचे अल्कलाईनमध्ये रुपांतर होते. परिणामी, अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होतो. नारळाच्या पाण्यात फायबर घटक अधिक प्रमाणात असल्याने पित्ताचा त्रास उलटण्याची शक्यता कमी होते. तसेच पोटात थंडावा निर्माण झाल्याने जळजळ कमी होते.

काकडी खावी :
काकडीमध्ये हि फायबर आणि पाण्याचं प्रमाण अधिक असतं. यामुळे पचनकार्य सुधारण्यास मदत होते. तसेच काकडीमध्ये पाणी अधिक असते. त्यामुळे काकडी अॅसिडीपासून शरीराला दूर ठेवते.

कलिंगड खावे :
कलिंगडामध्ये हि अधिक प्रमाणात फायबर असते. यामुळे चयापचयक्रिया सुरळीत होते. जर कलिंगडाचे सेवन केलात तर अॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळतो.