TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 9 जुलै 2021 – पुण्यातील अहिल्या अभ्यासिकासमोर एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांनी चक्काजाम आंदोलन सुरु केले होते. मात्र, रस्त्यावर पोलिसांच्या ७ – ८ गाड्या दाखल झाल्यानंतर आंदोलन स्थगित केले. यावेळी या निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी नियुक्ती त्वरित मिळावी, सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

एमपीएससी परिक्षेत उतीर्ण होऊनही निवड न झालेल्या अधिकाऱ्यांचे मनोबल खचू लागले असून दोन महिने उलटूनही अद्याप नेमणुका झालेल्या नाहीत. सरकारच्या वेळ काढू धोरणामुळे सर्वोच्च न्यायलयाच्या कचट्यामध्ये अडकलेल्या नियुक्त्यांसाठी विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत.

सरकारने लवकर उमेदवारांना नियुक्ती करावी. यासाठी एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी आंदोलन केले.

राज्य सेवा आयोगाच्या परिक्षाचा निकाल लागल्यानंतर ४१३ उमेदवारांची निवड झाली आहे. मात्र, मागील एक वर्षापासून यांना नियुक्ती दिलेली नाही. हे सर्व गट – अ पदी निवड झालेले अधिकारी आहेत. त्यामुळे सरकाच्या वेळकाढू धोरणाला कंटाळून हे अधिकारी आता रस्त्यावर उतरले.

विद्यार्थ्यांना सरकारच्या धोरणाचा फटका :
१९ जून २०२० रोजी परीक्षेचा निकाल लागला आहे. त्यानंतर २ महिन्यांत या नियुक्त्या होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने त्या न केल्याने ९ सप्टेंबर २०२० च्या मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यामध्ये या नियुक्त्या सापडल्या आहेत.

५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर इतर नियुक्त्या देण्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर २ महिने उलटून गेल्यानंतरही राज्य सरकारने त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही.