TOD Marathi

न सुटलेल्या गणिताची उकल भारताच्या ‘या’ Physicist ने केली ; मात्र, Research चा आढावा प्रसिद्ध करण्याकडे होतंय दुर्लक्ष

टिओडी मराठी, हैदराबाद, दि. 30 जून 2021 – अनेक कोडी आणि गणितं आहेत कि अदयाप सुटलेली नाहीत. त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. असेच एक न सुटलेल्या गणिताची उकल भारताच्या एका भौतिकशात्रज्ञाने केली आहे.

जर्मन गणितज्ञ जॉर्ज फ्रेडरिक बर्नहार्ड रिमान यांनी सर्वात पहिले रिमान हायपोथेसिस या गणिताची मांडणी केली होती. या हायपोथेसिसला सोडवल्याचा दावा आता भारतातील भौतिकशास्त्रज्ञ कुमार ईश्वरन यांनी केलाय.

या गणिताच्या कोड्याला क्ले मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूट ऑफ केम्ब्रिजएक दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस ठेवलंय. याचप्रमाणे इतर प्रश्नांवरही एक दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवलं आहे.

याच रिमान हायपोथेसिसला कुमार ईश्वरन ‘दी फायनल अँड एक्झॉस्टिव्ह प्रूफ ऑफ रिमान हायपोथेसिस फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल्स’ हा त्यांचा संशोधनविषयक अहवाल 5 वर्षांपूर्वीच इंटरनेटवर प्रसिद्ध केलाय.

मात्र, या संशोधनाचा आढावा/परीक्षण घेऊन ते प्रसिद्ध करण्याकडे आंतरराष्ट्रीय जर्नल्सचे संपादक दुर्लक्ष करत आहेत.

एका वृत्तपत्राशी बोलताना ईश्वरन यांनी सांगितलं आहे की,’या हायपोथेसिस सोडवणं गरजेचं होत. कारण, गणितज्ज्ञांना मूळ संख्या नेमकेपणाने मोजणं आता शक्य होणार आहे.

या दरम्यान, हैदराबादमधल्या श्रीनिधी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये मॅथेमॅटिकल फिजिसिस्ट म्हणून कार्यरत आहे. त्यांनी हैदराबादमधल्या श्रीनिधी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत मॅथेमॅटिकल फिजिसिस्ट म्हणून कार्यरत आहेत.