TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 14 मे 2021 – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. हि कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांना घातक ठरत आहे. कोरोना प्रामुख्यानं रुग्णाच्या फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे रक्तात ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या पेशी कमकुवत होतात. त्यामुळे ऑक्सिजन पातळी घटून असंख्य रुग्णांचा मृत्यू होतो. पण, रुग्णांची गंभीर अवस्था लक्षात घेता, डॉक्टर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देतात. पण, हे इंजेक्शन कोरोना रुग्णाच्या उपचारात किती प्रभावी आहे? यावर अगदी जागतिक आरोग्य संघटनेपासून इतरही अनेक तज्ज्ञांत मतभेद आहेत.

पण, हे इंजेक्शन कोरोना रुग्णांच्या उपचारात प्रभावी ठरत आहे, असे आता संशोधन नुकतचं प्रसिद्ध झालं आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या संशोधनात पुण्यातील महिला शास्त्रज्ञ डॉ. अपूर्वा मुळे हिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीय. अमेरिकेतील लॉस एंजलिस शहरामध्ये ‘सिडर्स सायनाय मेडिकल सेंटर’मध्ये कार्यरत डॉ. अपूर्वा मुळे यांनी हे संशोधन केलं आहे. ‘सेल रिपोर्ट्स’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत त्यांचं संशोधन प्रकाशित झालं आहे.

डॉ. अपूर्वा काळे यांच्या संशोधनातून महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट झाल्या आहेत. रेमडेसिवीर वापराबाबतच्या शंका-कुशंका दूर होण्यास मदत झालीय. यावेळी डॉ. मुळे यांनी एका मराठी दैनिकाला सांगितलं की, हे संशोधन करत असताना कोरोनाशी निगडीत असणाऱ्या औषधांच्या प्रत्यक्ष चाचण्या घेतल्या आहेत. यात रेमडेसिवीरचा वापर प्रभावी आहे, असे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे संबंधित मॉडेलचा वापर भविष्यातही अशाप्रकारच्या आजारांवर करता येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

डॉ. अपूर्वा मुळे यांच्याश डॉ. बॅरी स्ट्रिप यांचाही या संशोधनात मोलाचा वाटा आहे. मुळच्या पुण्यातील रहिवासी असणाऱ्या डॉ. मुळे यांनी पुण्यातील नामी फर्ग्युसन महाविद्यालयातून जैवतंत्रज्ञान विषयात पदवीचं शिक्षण घेतलंय. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या शेफिल्ड विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी पूर्ण असून अमेरिकेत पोस्टडॉकचं शिक्षण पूर्ण केलंय. आता त्या अमेरिकेतील लॉस एंजलिस याठिकाणी ‘सिडर्स सायनाय मेडिकल सेंटर’मध्ये कार्यरत आहेत.