TOD Marathi

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian womens cricket Team) आशिया कपच्या (Asia cup) फायनलमध्ये पोहोचली आहे. सिलहटमध्ये पार पडलेल्या सेमीफायनल सामन्यांमध्ये भारताने थायलंड विरुद्धत जोरदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या विजयमागे दिप्ती शर्माचा मोठा वाटा आहे. तिच्या वेगवान गोलंदाजीने 4 ओव्हरमध्ये 7 धावा देऊन 3 विकेट काढल्या. शेफाली वर्माने 28 चेंडूत 42 धावा ठोकल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौरने 36 धावा केल्या.

टीम इंडियाचे प्रदर्शन सुरुवातीला खराब होते. स्मृती मांधना फक्त 13 धावांवर आऊट झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सने खेळपट्टीवर पाय रोवले. पण ती वेगाने धावा बनवू शकली नाही. तिने 26 चेंडूत 27 धावा केल्या. दुसऱ्याबाजूला शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी केली.शेफालीने 150 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. हरमनप्रीतने 30 चेंडूत 36 धावा केल्या. हरमनप्रीत शेवटच्या शतकात वेगाने धावा जमवू शकली नाही.

तर पॉवरप्लेयर दिप्ती शर्माच्या गोलंदाजीमुळे थायलंडला पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 148 धावा केल्या. खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल होती. त्यामुळे भारतीय टीमला मोकळेपणाने खेळता आले नाही. मात्र भारतीय गोलंदाजांनी पीचचा पुरेपूर फायदा उचलला व थायलंडला फक्त 74 धावांवर थांबवलं. टीम इंडियाने थायलंडवर 74 धावांनी विजय मिळवला.