TOD Marathi

पीएचडी प्राप्त करण्यासाठी साधारण पाच वर्षांचा कालावधी लागतो, हे तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल. मात्र,हीच पीएचडी केवळ 14 महिन्यात पूर्ण झाली तर… आश्चर्य वाटेल ना? मात्र हेही शक्य झालं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांना अवघ्या 14 महिन्यात मुंबई विद्यापीठाने पीएचडीची पदवी बहाल केल्याची चांगलीच चर्चा आहे. (Neil Somayya completed his Ph.D in 14 months Mumbai University) आणि यामुळे ते एका नव्या वादात देखील सापडले आहेत. निल सोमय्या यांना पीएचडीची पदवी प्रदान करताना काही अयोग्य नाही, मात्र या सगळ्यात मुंबई विद्यापीठाने दाखवलेली तत्परता आणि वेग मात्र सर्वांच्याच कुतूहलाचा विषय झाला आहे.

ऑगस्ट महिन्यात नील यांनी पीएचडीसाठी आपला प्रबंध सादर केला होता. त्यानंतर नील सोमय्या यांना अवघ्या दीडच वर्षात तोंडी परीक्षेसाठी बोलावण्यात आलं, ही तोंडी परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई विद्यापीठाने नील सोमय्या यांना पीएचडी पदवी प्रदान केली. या सगळ्या प्रकाराची सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चा होत आहे. ईतक्या एक्सप्रेस वेगाने पीएचडी पदवी कशी देण्यात आली? असा सवालही नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. (Netizens asked question about Ph.Dof Neil Somayya)

निल सोमय्या यांच्या पीएचडीच्या पदवीच्या नोंदणीची तारीख आहे जून 2021 तर त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्याची तारीख आहे 1 ऑक्टोबर 2022. त्यांनी 2017 मध्ये डॉक्टरेटच्या अभ्यासक्रमासाठी सीडनहम कॉलेजमधून नोंदणी केली होती. त्यानंतर नील यांच्या अभ्यासाचा वेग धक्क करणारा आहे.

मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक असलेल्या नील यांनी अवघ्या दीड वर्षांमध्ये पीएचडी कशी मिळवली? असा प्रश्न अनेक लोक उपस्थित करत आहेत. नील यांचे मार्गदर्शक म्हणून एम. ए. खान हे होते. 2021 मध्ये सोमय्या यांच्या पीएचडीच्या विषयात काही सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा वर्षभरात त्यांनी आपला प्रबंध सादर केला. मात्र, विद्यापीठाने निल यांनी पीएचडी पदवीच्या अभ्यासक्रमासाठी 2017 मध्ये नोंदणी केल्याची बाब विद्यापीठाने का नमूद केली नाही, याविषयी एम. ए. खान यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते.

नील यांना पीएचडी पदवी देताना सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले आहे. मात्र, मुंबई विद्यापीठाने कोणताही विलंब न लावता सर्व गोष्टी पार पाडल्या. एरवी विद्यापीठ कोणत्याही पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्या प्रबंधाबाबत इतकी तत्परता दाखवत नाही, असेही एम. ए. खान यांनी म्हटलं आहे. नील सोमय्या यांचा पीएचडीचा प्रबंध मार्च 2020 मध्ये सबमिट करण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाच्या साथीमुळे फार काही घडू शकलं नाही. त्यानंतर हा प्रबंध मंजूर करण्यासाठी संशोधन आणि मान्यता समितीने पीएचडीच्या विषयांमध्ये काही सुधारणा सुचवल्या होत्या, अशीही माहिती त्यांनी दिली.

यावर स्पष्टीकरण देताना मुंबई विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आलं की, (Mumbai University gives clarification about Ph.D pf Neil Somayya) नील सोमय्या यांनी 2021 मध्ये पीएचडीसाठी नोंदणी केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये त्यांनी प्रबंध सादर केला. हा कालावधी 14 महिने इतका आहे, नियमानुसार पीएचडीसाठी नोंदणी केल्यानंतर 12 महिन्यांनी संबंधित विद्यार्थ्याला आपला प्रबंध सादर करता येतो. त्यामुळे निल यांना देण्यात आलेली पीएचडीची पदवी योग्य आहे. अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली.