टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 29 जुलै 2021 – सध्या टोकयो ऑलिम्पिक्स येथे अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या टोकयो ऑलिम्पिक्समध्ये जिंकणाऱ्या आणि यात सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना आणि खेळाडूंच्या प्रशिक्षकांना रेल्वेकडून सन्मानित करण्यात येणार आहे, याबाबतची घोषणा रेल्वेकडून केली आहे. ऑलिम्पिक्समध्ये जिंकणारे खेळाडू, सहभाग घेणारे खेळाडू आणि खेळाडूंच्या प्रशिक्षकांना प्रमोशन्स, इंक्रिमेंट्स आणि स्पेशल कॅश अवॉर्ड्स, तसेच इतर अनेक पॉलिसींची सुविधा देणार आहे. खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी ही घोषणा केली आहे, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.
रेल्वेकडून गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूला सुमारे 3 कोटी रुपये कॅश रिवॉर्ड देणार आहे. तसेच सिल्व्हर मेडल पटकवणाऱ्या खेळाडूला 2 कोटी रुपये, ब्रॉन्झ मेडल विजेत्या खेळाडूला 1 कोटी रुपये कॅश रिवॉर्ड देणार आहे, असे सांगितलं आहे.
Tokyo Olympics मध्ये खेळाडू शेवटच्या आठ खेळाडूंमध्ये असल्यास त्यालाही पुरस्कृत करणार आहे. अशा खेळाडूंना 35 लाख रुपये देणार आहेत. तसेच ऑलिम्पिक्समध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला साडेसात लाख रुपये देणार आहेत.
केवळ खेळाडूचं नाही, तर त्यांच्या कोच अर्थात प्रशिक्षकांना देखील कॅश रिवॉर्ड देणार आहे. गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकाला 25 लाख रुपये, सिल्व्हर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकाला 20 लाख रुपये मिळणार आहेत.
तसेचग ब्रॉन्झ मेडल पटकावलेल्या खेळाडूच्या प्रशिक्षकाला 15 लाख रुपये आणि ऑलिम्पिक्समध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंच्या कोचला 7.5 लाख रुपये देणार आहे.
भारतीय रेल्वे Tokyo Olympics Games मध्ये खेळाडूंसाठी 20 टक्क्यांपर्यंत योगदान देत असते. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डकडून टोकयो ऑलिम्पिक्स गेम्समध्ये 25 खेळाडू, 5 कोच आणि 1 फिजिओ सामिल झाले आहेत.