TOD Marathi

टिओडी मराठी, टोकियो, दि. 7 ऑगस्ट 2021 – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा आघाडीचा पैलवान बजरंग पुनियाने कांस्यपदक मिळवलं आहे, त्यामुळे भारताच्या खात्यात सहावे पदक टाकलं. बजरंगचे सर्व देशभरातून कौतुक होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बजरंगचे कौतुक केलं आहे.

बजरंगजने कझाकिस्तानच्या पहिलवानाला एकही गुण मिळवून दिला नाही. 65 किलो वजनी गटात कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवकला 8-0 ने अशा फरकारने पराभूत केलं. आणि

पहिल्या राऊंडमध्ये भारताच्या बजरंग पुनियाला 2-0 अशी आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये बजरंगने आपले ठेवणीतले डाव टाकत 6 गुणांची कमाई केली.

बजरंगने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला एकही गुण घेण्याची संधी दिली नाही. बजरंगच्या पदकामुळे आता भारताने एकूण सहा गुणांची कमाई केली.

बजरंगने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. 25 वर्षीय बजरंग जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे.

बजरंगचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता. त्याचा अझरबैजानचा हाजी अलीयेबने 12-7 ने पराभव केला होता.