TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 7 ऑगस्ट 2021 – कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने देशात लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. सर्व देशवासियांचे लसीकरण केंद्र सरकार करणार आहे, असे सरकारने जाहीर केलंय. भारतात कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या लसींना परवानगी दिली होती. अशात आणखी एका लसीचा परवानगी दिली आहे. यामुळे आता लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे, असं समजतंय

केंद्र सरकारने आपतकालीन वापरासाठी जॉन्सन अँड जॉन्सन या लसीला परवानगी मिळाली आहे.

याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी माहिती दिलीय. यासंदर्बात त्यांनी ट्विट केलंय. या लसीला परवानगी दिल्यामुळे भारताकडे आता एकूण पाच लसी कोरोना लढ्यामध्ये सामील झाल्यात.

भारताने आपली व्हॅक्सिन बास्केट वाढवलीय. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोवि़ड-19 लसीला भारतात आपातकालीन वापरास मंजुरी दिली आहे.

आता भारतात कोरोनाविरोधात लढण्यासाठी 5 लसीचा परवानगी आहे. यामुळे देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मदत होणार आहे, असे मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनची लस 85 टक्के प्रभावी असल्याचे कपंनीचे म्हणणं आहे. साउथ आफ्रिका व ब्राझील व्हेरिएंटवर ही लस प्रभावी ठरल्याचा दावाही कंपनीने केलाय.