TOD Marathi

टिओडी मराठी, बुडापोस्ट, दि. 28 जुलै 2021 – जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या युवा कुस्तीपटूंनी 5 सुवर्ण पदकांसह एकूण 13 पदके पटकाविले आहे. खेळाडूंच्या या कामगिरीचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले आहे. तसेच पुढील आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्यात.

या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी रविवारी प्रिया मलिकने 73 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात बेलारुसची कुस्तीपटू सेनिया पट्टापोविचला 5-0 असे पराभूत करत सुवर्णपदक मिळवले होते.

या स्पर्धेत प्रिया मलिकसह युवा कुस्तीपटू तनू हिनेही जागतिक कॅडेट गटामध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिने 43 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यामध्ये बेलारुसच्या वेलेरिया मिकित्सिचला पराभूत केलं.

त्यासह कोमल पांचाळने 46 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. अन्य दोन महिला कुस्तीपटू वर्षा (65 किलो वजनी गट) आणि अंतिम (53 किलो वजनी गट) यांनी ब्रॉंझपदकाची कमाई केलीय.

भारतीय महिला संघ पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. अमेरिका संघाने पहिले, तर रशियाने तिसरे स्थान मिळवले आहे.