TOD Marathi

Jammu & Kashmir मधील किश्तवाडमध्ये ढगफुटी ; 4 जणांचा मृत्यू तर 40 जण बेपत्ता, बचावकार्य सुरू

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 28 जुलै 2021 – जम्मू-काश्मीर राज्यातील किश्तवाड जिल्ह्यातील एका गावात ढगफुटी झाली असून यात चार जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३० ते ४० लोक बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहेत. बचाव दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जम्मू प्रदेशातील किश्तवार जिल्ह्यातील होन्जार गावामध्ये बुधवारी पहाटे ढगफुटी झाल्यानंतर या दुर्घटनेत चार मृतदेह सापडले आहेत. तर ४० हुन अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.

पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास किश्तवार जिल्ह्यातील दाछिन परिसरातील होन्जार गावामध्ये ढगफुटी झाली आहे. त्यानंतर ३० ते ४० लोक बेपत्ता झाले आहेत.

त्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. आमच्याकडे अद्याप अचूक माहिती मिळालेली नाही तसेत येथे मोबाईल फोन कनेक्टिव्हिटी मिळत नाही.

किश्तवाडचे जिल्हा पोलिस प्रमुख एसएसपी शफकत भट यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून आतापर्यंत आम्हाला चार मृतदेह सापडलेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा गावात ३० ते ४० लोक होते.

किश्तवाड़ शहर जम्मूपासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे. आणि दाछिन हे किश्तवार जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ परिसरामध्ये आहे. या किश्तवाडमधील ढगफुटीमुळे झालेल्या घटनेमुळे जखमींना बाहेर काढण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.