TOD Marathi

‘असा’ राष्ट्रपती होणार नाही !; मिसाईलमॅन A.P.J. Abdul Kalam यांच्या स्वाक्षरीचा ‘तो’ चेक एमडींनी ठेवला जपून

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, कोईम्बतूर, दि. 27 जुलै 2021 – भारताचे दिवंगत राष्ट्रपती आणि मिसाईलमॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. 27 जुलै 2015 रोजी कलाम यांचं निधन झालंय. एका सर्वसामान्य गरीब घरातील मुलगा ते देशाचे राष्ट्रपती असा त्यांनी प्रवास केला. देशाच्या क्षेपणास्त्र सज्जतेत त्यांचं मोलाचे योगदान आहे. राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचल्यानंतरही कलाम यांचा साधेपणा कायम राहिला होता. देशातील कित्येकांपुढे त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आहेत. त्यातलाच एक किस्सा मिक्सर खरेदीचा आहे.

कोणाकडूनही भेटवस्तू स्वीकारायची नाही, असा कलाम यांचा दंडक होता. २०१४ मध्ये ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना तमिळनाडूतील एका कार्यक्रमामध्ये बोलावलं. इरोडे इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सौभाग्य वेट ग्राईंडर्सनं प्रायोजकत्व दिलं होतं.

सौभाग्यचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. अदिकेसवन यांनी त्यावेळी घडलेला सांगितलेला एक किस्सा ए. पी. जे. अब्दुल कलाम त्यांच्या तत्त्वांशी किती एकनिष्ठ होते याची साक्ष देतोय.

सौभाग्यचे प्रायोजकत्व असलेल्या कार्यक्रमाला ए. पी. जे. अब्दुल कलाम ऑगस्ट २०१४ रोजी उपस्थित राहिले होते. त्यांना सौभाग्यकडून मिक्सर ग्राईंडर भेट दिला होता. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भेट स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.

मात्र, कुटुंबाला मिक्सरची गरज होती, त्यामुळे त्यांनी तो विकत घेण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी ४ हजार ८५० रुपयांचा चेक (धनादेश) दिला. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत, म्हणून अदिकेसवन यांनी तो चेक बँकेत जमा केला नाही.

महिना उलटूनही बँक खात्यातून पैसे वजा न झाल्यानं ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून अदिकेसवन यांना चेकबद्दल विचारणा केली. त्यावेळी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना वस्तुस्थिती समजली. चेक बँकेत जमा करा, अन्यथा मिक्सर परत करतो, असा इशारा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी फोनवरून दिला.

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची स्वाक्षरी असलेला चेक अदिकेसवन यांना बँकेत जमा करायचा नव्हता. पण, चेक वठला नाही तर ए. पी. जे. अब्दुल कलाम मिक्सर परत करतील ही भीती होती. अखेर अदिकेसवन यांनी त्या चेकची आणखी एक कॉपी काढली, अन मूळ चेक बँकेत जमा केला.

चेक वठल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यालयातून आभार मानणारा फोन आला. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची स्वाक्षरी असलेला चेक अदिकेसवन यांनी फ्रेम करून ठेवला आहे.