भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West indies) आज मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर (One day ) २६६ धावांचे आव्हान ठेवले आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेला भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीसमोर डगमगताना दिसला. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं ५० षटकात ९ विकेट्स गमावून २६७ धावा केल्या आहेत.
या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं उत्कृष्ट गोलंदाजी केली. कॅप्टन रोहित शर्माला 13 धावांवर अलझारी जोसेफने क्लीन बोल्ड केले. विराट कोहलीला देखील अलझारी जोसेफने विकेटकिपर शाई होपकडून झेलबाद केले. शिखर धवनने ओडियन स्मिथला ड्राइव्ह करण्याच्या प्रयत्नात स्लीपमध्ये जेसन होल्डरकडे सोपा झेल दिला आणि तो ही १० धावाच करू शकला.
श्रेयस अय्यरची आणि ऋषभ पंतने मात्र भारताचा डाव संभाळला. ऋषभ पंत (५६) आणि श्रेयस अय्यर (८०) दमदार अर्धशतक झळकवल्यानंतर बाद झाले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११० धावांची खेळी केली. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर भारताचा अडचणीत सापडलेला डाव दीपक चहर आणि वॉशिंग्टन सुंदरने सावरला. मात्र, होल्डरने त्याला ३८ धावांवर होपकडून झेलबाद केले. वॉशिंग्टन सुंदर (३३), कुलदीप यादव (५), सिराज (४) धावा केल्या. ५० षटकात भारताचा संपुर्ण डाव २६५ धावांवर आवरला.
भारताने मालिकेत आधीच विजयी आघाडी घेतली असून, आजचा सामना जिंकून मालिकेत ३-० असा क्लीनस्वीप विजय मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. तर वेस्ट इंडीजकडून २६६ धावांचे आव्हान पार करून या मालिकेत भारताला क्लीनस्वीप विजय मिळवण्यापासून थांबण्याचा प्रयत्न असेल.