TOD Marathi

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी आज पहाटे ३.३० वाजता त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले.अभिनेत्री रवीना टंडनचे ते वडील होते. रवीनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांना दिली आहे.

रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांना दिल्याचे समोर आले आहे. रवीनाने तिच्या वडिलांसोबत फोटो शेअर करत म्हणाली की “तुम्ही नेहमी माझ्याबरोबर चालत रहाल, मी नेहमीच तुमची असेन, मी कधीही तुम्हाला जाऊ देणार नाही. लव्ह यू बाबा,” असे कॅप्शन तिने दिले आहे.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अस समोर आले आहे की रवी टंडन हे मागील काही दिवसांपासून फुफ्फुसाचा त्रास होत होता. रवी टंडन हे फुफ्फुसातील फायब्रोसिस नावाच्या आजाराने ते त्रस्त होते. यामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत असलेच देखील त्यावेळी समोर आले होत.

रवी टंडन यांचे सुपरहिट झालेले चित्रपट..

रवी टंडन यांनी ७० आणि ८० च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले होते. ‘खेल खेल में’, ‘नजराना’, ‘एक मैं और एक तू’, ‘जवाब’, ‘मजबूर’, ‘अनहोनी’, ‘खुद्दार’, ‘जिंदगी’, ‘आन और शान’, ‘निर्माण’, ‘झूठा कहीं का’, ‘चोर हो तो ऐसा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्यांनी आपला चित्रपटसृष्टीत ठसा उमटवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी दिग्दर्शन कारकीर्दीची सुरूवात केली आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच निर्मिती केली. १९६० मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह इन शिमला’ या चित्रपटात ते अभिनेता म्हणून देखील झळकले होते.