TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 24 जून 2021 – भारताला २०२० मध्ये सुमारे ६४ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक अर्थात एफडीआय मिळाली आहे. एफडीआय लाभार्थींच्या यादीमध्ये भारत पाचव्या स्थानी राहिला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेने (यूएनसीटीएडी) जारी केलेल्या ‘जागतिक गुंतवणूक अहवाल २०२१’मध्ये ही माहिती दिली आहे. या अहवालानुसार, जागतिक एफडीआय प्रवाहास कोविड-१९चा फटका बसला आहे.

२०२० मध्ये एफडीआय ३५ टक्क्यांनी घटून १ लाख कोटी रुपयांवर आलाय. अगोदरच्या वर्षी तो १.५ लाख कोटी रुपये होता. कोविड-१९ मुळे सध्याचे गुंतवणूक प्रकल्प धीमे झालेत. तसेच नवे प्रकल्प रखडलेत.

अहवालात असे म्हटले आहे की, २०२० मध्ये भारताच्या एफडीआयमध्ये २७ टक्क्यांची वाढ झालीय. २०१९ मध्ये ५१ अब्ज डॉलरवर असलेला भारताचा एफडीआय २०२० मध्ये ६४ अब्ज डॉलरवर गेलाय.

एफडीआय प्राप्त करणाऱ्या देशांत भारताचा पाचवा क्रमांक लागला आहे. अहवालात असे म्हटले आहे. कोविड-१९ मुळे डिजिटल पायाभूत क्षेत्र तसेच जागतिक सेवा क्षेत्र यांच्या मागणीत मोठी वाढ झालीय. त्यामुळे आयसीटी उद्योगातील एफडीआय प्रकल्प २२ टक्क्यांनी वाढून ८१ अब्ज डॉलरवर गेलेत.