TOD Marathi

Bharat Biotech ला झटका?; Brazil ने ‘या’मुळे स्थगित केला 32 कोटी डॉलर्सचा करार

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 30 जून 2021 – कोरोनामुक्त होण्यासाठी अनेक देश लसीकरणावर भर देत आहेत. त्यासाठी प्रत्येक राष्ट्र एकमेकांची मदत करण्यासाठी पुढे येत आहे. ब्राझील सरकारने लसीसाठी भारत बायोटेक सोबत केलेला करार स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. याचा झटका भारत बायोटेकला बसला आहे.

ब्राझीलबरोबर 32.4 कोटी डॉलरचा करार भारत बायोटेकने केला होता. त्यामुळे मोठा करार स्थगित झाल्यामुळे भारत बायोटेकला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या रोपानंतर देशाने हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ब्राझीलचे आरोग्यमंत्री मार्सेलो किरोगा यांनी ही माहिती दिलीय. बोल्सोनारो यांनी कोणत्याही प्रकारची अनियमितता नाकारली आहे.

ब्राझीलमध्ये या करारावर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्यानंतर आता 32 कोटी डॉलर्सचा हा करार रद्द केला आहे. या करारानुसार ब्राझील – भारत बायोटेककडून एकूण 20 कोटी लसीचे डोस खरेदी करणार होता. मात्र, ब्राझीलमध्ये या करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. जाइर बोल्सोनारो यांच्यावर भ्रष्टाचार लपवण्याचा आरोप केला आहे.

ब्राझीलच्या माध्यमांनुसार, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत लसींसाठी केलेला करार स्थगित राहिल. या दरम्यान ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाकडून वारंवार दावा केला जात आहे की, या करारात कोणताही गैरप्रकार केलेला नाही.

याअगोदर ब्राझीलने मंत्रालयाने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे कि, सीजीयूच्या प्राथमिक विश्लेषणानुसार करारामध्ये कोणतीही अनियमितता नाही. परंतु त्या पाळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय.