TOD Marathi

टी20 विश्वचषक स्पर्धेत सुरू असलेल्या भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील सामन्यात काही काळ पावसाने व्यत्यय आणला होता. भारताची फलंदाजी होऊन भारतानं 185 धावांचं टार्गेट बांगलादेशला दिलं होतं. दरम्यान, बांगलादेशच्या 7 ओव्हर्स खेळून झाल्यावर पाऊस आला, ज्यानंतर आता सामना पुन्हा सुरु झाला आहे. आणि आता 16 ओव्हर्सचा खेळ कऱण्यात आला आहे. तसंच बांगलादेशचं टार्गेट 151 करण्यात आलं आहे. त्यामुळे आता बांगलादेशला 54 बॉलमध्ये 85 रन करायचे आहेत.

या सामन्यात सर्वात आधी बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी (Bangladesh won toss and chose to ball first) करण्याचा निर्णय घेतला. भारताला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य पूर्ण लवकर करायचा प्लॅन त्यांनी आखला होता. त्यानुसार बांगलादेशनं भारताचा कर्णधार रोहितला अवघ्या 2 धावांवर तंबूतही परत पाठवलं. के एल राहुलही हळू-हळू खेळत होता. पण विराट जोडीला आला आणि राहुल-विराटने जोरदार फटकेबाजी सुरु केली. 50 धावा करुन राहुल बाद झाला, त्यानंतर सूर्यकुमारनेही 30 धावांची चांगली खेळी केली. त्यानंतर मात्र पांड्या, अक्षर, कार्तिक हे लवकर बाद झाले. अखेर आश्विनने 6 बॉलमध्ये नाबाद 12 महत्त्वपूर्ण धावा केल्या. विराट कोहलीच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर भारतानं 184 धावा केल्या. (Virat Kohli shot 64 runs)

आता बांग्लादेशचा संघ 185 धावा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. बांगलादेशकडून हसन महमूदनं 3 तर कर्णधार शाकीब अल् हसननं 2 विकेट्स घेतल्या आहेत.