TOD Marathi

‘फायटर’ चित्रपटात हृतिक रोशन ( Hrithik Roshan ) आणि दीपिका पदुकोण ( Deepika Padukone ) पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. दीपिका आणि हृतिक चे चहाचे या चित्रपटाची आतुरते ती वाट पाहत आहे. त्यांची प्रतीक्षा संपली आहे. अलीकडेच, हृतिकने त्याच्या सोशल मीडिया पेजवर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत एक मोठी घोषणा केली आहे. यापूर्वी बातमी आली होती की फायटर 2023 मध्ये रिलीज होणार आहे पण आता चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे ज्यामध्ये फाईट प्लेनवर रिलीजची तारीख स्पष्टपणे लिहिलेली आहे.
फायटरचा फर्स्ट लुक समोर आला असुन त्याचे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. पोस्टरवर फायटर प्लेन आकाशात उडताना दिसत आहेत. ज्यावर लिहिले आहे ‘फाइटर’ 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटाची आधी पासूनच जोरदार चर्चा आहे. लोक त्यांच्या दोन्ही आवडत्या स्टार्सला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.अलीकडेच, पिंकविलाने एक अहवाल प्रकाशित केला होता ज्यात दावा केला आहे की सिद्धार्थ आनंदने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी व्हीएफएक्स बनवणाऱ्या ‘DNEG’कंपनीसोबत त्याच्या फायटर चित्रपटासाठी करार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘फायटर’ हा एक उत्कृष्ट हवाई अ‍ॅक्शन सीक्वेन्ससह भेटीला येणारा चित्रपट आहे. जो भारतीय प्रेक्षकांसाठी एक उत्तम अनुभव असणार आहे.
यासोबतच सिद्धार्थ आनंदने दावा केला की, ‘भारताच्या पहिल्या एरियल ॲक्शन फ्रँचायझीमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणला पाहण्यासाठी सज्ज व्हा’. व्हीएफएक्ससाठी ऑस्करमध्ये अनेकवेळा पुरस्कार मिळालेल्या एजन्सीलाही नियुक्त करण्यात आले आहे.फायटर 15 नोव्हेंबरपूर्वी शेड्यूलसह शूटिंगला सुरुवात केली जाईल.आणि त्यानंतर पठाणच्या जानेवारीमध्ये रिलीज झाल्यानंतर रेगुलग शूटिंग केले जाईल. या चित्रपटात अनिल कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षक आता ‘फायटर’ या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहे.