TOD Marathi

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. (Sambhaji Bhide met CM Eknath Shinde)  मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर उत्तर देताना संभाजी भिडे यांनी ‘प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही.
कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन’ असे अपमानजनक शब्द वापरले, याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.

या सर्व प्रकरणावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया

साम टीव्हीच्या महिला पत्रकाराला तु टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणार्या संभाजी भिडेंचा निषेध आहे. याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी आज केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा.

  • रुपाली चाकणकर

अध्यक्षा, राज्य महिला आयोग

#महिला पत्रकाराला टिकली लावूनच बोलण्याच्या अजब आग्रहावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची संतप्त प्रतिक्रिया:संभाजी भिडे गुरुजींना काही प्रश्न विचारले असता त्यांनी महिलांच्या वैयक्तिक बाबतीत झोटिंगशाहीची भुमिका घेतली.

    • डॉ. नीलम गोऱ्हे,
      उपसभापती विधान परिषद

भिडे यांच्या या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करते. पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत असे प्रकार कदापी सहन न होणारे आहेत. सध्या माध्यमकर्मी आणि पत्रकारांना सातत्याने अपमानाला सामोरं जावं लागतं आहे, हे निषेधार्ह आहे. रुपाली बडवे यांच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम!

  • यशोमती ठाकुर, माजी महिला व बालकल्याण मंत्री

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने महिलांना समान अधिकार बहाल केला असून त्यांना वेशभुषेची निवड करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. पण प्रतिगामी पुरूषप्रधान व्यवस्थेचा टेंभा मिरवणारे असे तथाकथित बुवा समानतेच्या या मूलभूत अधिकाराची पायमल्ली करत आले आहेत.
– वर्षा गायकवाड, माजी शिक्षणमंत्री

भिडे यांनी सामच्या प्रतिनिधी सांगितल भारतमाता विधवा नाही..प्रत्येक स्त्री भारत मातेसमान असते तू कुंकू लाव ..मग बोलेन..म्हणजे स्त्री टिकली लावते की नाही यावर तिचा मान अवलंबून आहे?? निषेध संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा #निषेध

रश्मी पुरानिक, पत्रकार