टिओडी मराठी, मुंबई, दि. 30 मे 2021 – महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे.
ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक केले जातील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी आज संध्याकाळी जनतेला संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
– राज्यात दरवर्षी चक्रीवादळाचा धोका असतो त्यात, कोरोनाचं संकट त्यात चक्रीवादळ याचा फटका बसला.
– राज्यात 55 लाख शिवभोजन थाळ्या दिल्या मोफत
– कोरोना लाट खाली येत असल्यामुळे निर्बंध उठवणार का? असा सवाल केला जातोय.
– मागील लाटेत सर्वोच्च संख्येच्या बरोबरीने आजची आकडेवारी आहे, त्यामुळे भीती अजून टळलेली नाही.
-17 ते 21 सप्टेंबर 24 हजार रुग्ण तर 26 मे रोजी 24,752 रुग्ण सापडले आहेत.
– राज्यात काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतेय
-ऑक्सिजन काही तासांसाठी शिल्लक, हे वाक्य ऐकून आजही घाबरायला होतं.
– तिसरी लाट येणार, पण कधी येणार? हे माहीत नाही.
– राज्यापुढे कोरोनासह बुरशीचं संकट
– ‘माझा डॉक्टर’ संकल्पनेचं केलंय आयोजन
– म्युकरमायकोसिसचे राज्यात तीन हजार रुग्ण