TOD Marathi

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. गेल्या २८ तासांपेक्षा जास्त काळापासून ही छापेमारी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे आयकर विभागाचे कर्मचारी सर्व तयारीने आले असून, हे धाडसत्र आणखी काही काळ चालणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. सात ते आठ अधिकाऱ्यांनी कालची रात्र पार्थ पवार यांच्या ऑफिसमध्येच घालवली. त्यानंतर आज सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात झाली.

अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, तसेच नातेवाईकांच्या मुंबई, गोवा, सातारा, पुणे, बारामती इथल्या कंपन्यांवर आजही आयकर विभागाकडून छापेमारीची शक्यता आहे. मुंबईत पार्थ पवार यांचे कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोराडिया ग्रुप, डीबी रियालिटी, या कंपन्यांच्या मालकांच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी झाल्याची सूत्रांची माहिती.