TOD Marathi

परभणी: आजकाल तरुण पिढी वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च करून पार्ट्या करतात. त्या पार्ट्या करून सुद्धा फार काही साध्य होत नाही. मात्र परभणी जिल्ह्यातील राणीसावरगाव येथील अजिंक्य माधावराव जाधव या तरुणाने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केला. सध्या कोरोनाच्या काळात लसीकरण हे एकमेव औषध आहे आणि याच समाज हिताची जाणीव ठेऊन अजिंक्य जाधव याने लसीकरण शिबिर आयोजित केले.

आजकाल सामान्य नागरिकांच्या लस मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळतात. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाहीये. या गोष्टीची जाणीव ठेऊन आणि आपण समाजाचे देणं लागतो या भावनेने अजिंक्य जाधव यांनी दिनांक ६ ऑक्टोबर रोजी राणीसावरगाव इथे लसीकरण शिबिर आयोजित केले.

या शिबिरात सभापती तसेच कृषी व पशुसंवर्धन तथा जी. प. सदस्य श्रीनिवास मुंढे यांची उपस्थिती लाभली. त्याच सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली जाधव, सरपंच प्रतिनिधि राजेभाऊ जाधव, बंडू जाधव (ग्रा. प. सदस्य रा.सावरगाव), दिनेश अप्पा चालोदे (ग्रा. प. सदस्य रा.सावरगाव), पांढरी राठोड (ग्रा. प. सदस्य रा.सावरगाव), आदींची उपस्थिती होती.