TOD Marathi

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 4 मे 2021 – कोल्हापूर जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मतमोजणी सुरू आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये सतेज पाटील यांच्या गटाचे तीन उमेदवार विजयी झालेत.

आज गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी सुरु असून निकाल जाहीर होत आहे. कोल्हापूर गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांच्या चुरस बघायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठ्या गोकूळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी करोना संसर्गाचा प्रसार होत असतानाही प्रचाराचा धुरळा उडाला होता. ३ मे रोजी जिल्ह्यातील ७० मतदार केंद्रांवर मतदान झाले. २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर मतदानासाठी सत्तारूढ आणि विरोधी दोन्ही आघाड्यांनी शक्तिप्रदर्शनावर भर दिलेला होता.

आज गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. आतापर्यंत सतेज पाटील यांच्या गटाचे तीन उमेदवार विजयी झाले असून सुजित मिणचेकर यांनी ३४६ मतांनी विजयी मिळविला आहे. तर अमर पाटील यांनी ४३६ मते व बयाजी शेळके यांनी २३९ मतांनी विजयी झाले आहेत.