TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 मे 2021 – महारष्ट्रात कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. पहिली ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करून पुढील वर्गात ढकलले आहे. तर, दहावीची बोर्डाची परीक्षा सुद्धा पुढे ढकलली आहे. मग, आता 11 वीमध्ये प्रवेश कसा मिळणार?; हे सरकार सार्थक शिक्षण विभाग सीईटी घेणार आहे का ?, असा प्रश्न विद्यार्थ्याना पडत आहे. तसेच 11 वीच्या प्रवेशासाठी सरकार सीईटी परीक्षेचा विचार करत आहे, असे समजतंय.

दहावीच्या बोर्ड परीक्षा कोरोनामुळे घेता आल्या नाही. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना कसा प्रवेश घेता येईल?, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण मंडळाकडून अकरावीत प्रवेश करण्यासाठी सामायिक परीक्षा घेण्याबाबत चाचपणी केली जात आहे.

त्यामुळे शिक्षण विभागाकडून आता १० वीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन केले जाणार आहे. यासाठी शिक्षण विभाग एक सर्वेक्षण करणार आहे, असे समजतंय. शिक्षण विभाग सर्व शाळांना लिंक शेअर करून माहिती गोळा केली जाणार आहे. यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मतं सुद्धा नोंदवता येणार आहेत. या सर्वेक्षणानंतर एक अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर सामायिक परीक्षा घेण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल.

गेल्या महिन्यात दहावीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करावे, यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय घेतला होता. दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. विद्यार्थ्यांचं इंटरनल असेसमेंट होणार असून त्या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा करुन सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

दहावीच्या शाळा यंदा ऑनलाईन पद्धतीने झामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता.