TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 मे 2021 – देशात कोरोनाची दुसरी लाट असल्यामुळे शासकीय कार्यालयात 50 टक्के उपस्थिती अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची आहे. तसेच बँकेची परिस्थिती आहे. यातच बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन सारखी स्थिती असल्यामुळे बँकेची कामे खोळंबली असतील. यातच आजपासून 8 दिवस बँका बंद राहणार आहेत, असे चित्र आहे. त्यामुळे खोळंबलेली बँकेची कामे लवकरात लवकर करा. त्याअगोदर जाणून घ्या, बँकेच्या सुट्ट्यांचे दिवस कोणते आहेत.

असे आहेत सुट्ट्यांबाबत सर्व राज्यांसाठी वेगळे नियम :
आरबीआयच्या वेबसाइटनुसार मे महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद असणार आहेत. यात आठवड्याच्या सुट्ट्या हि समाविष्ट आहेत. यापैकी काही सुट्ट्या झाल्यात, तर अद्यापही आठ सुट्ट्या बाकी असून उर्वरित महिन्यात आणखी आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयच्या वेबसाइटनुसार, काही सुट्ट्या काही ठराविक राज्यामध्ये असतात, इतर राज्यांवर त्याचा परिणाम होत आहे.

अशी आहे सुट्ट्यांची यादी :
-9 मे: रविवार (सर्व राज्यात सुट्टी)
-13 मे: रमजान ईद (ईद-उल-फितर). यादिवशी बेलापूर, जम्मू, कोचीन, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरममध्ये इ. ठिकाणी बँका बंद असतील
-14 मे: भगवान श्री परशुराम जयंती / रमजान ईद (ईद-उल-फितर) / बसवा जयंती / अक्षय तृतीया यादिवशी बेलापूर, जम्मू, कोचीन, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरममध्ये इ. ठिकाणी बँका बंद असतील
-16 मे: रविवार (सर्व राज्यात सुट्टी)

सध्या दररोज 4 लाख नवे कोरोना रुग्ण आढळून येत असून हि परिस्थिती पाहता अनेक बँकांनी त्यांच्या ग्राहकांना बँकेशी संबंधित कामे ऑनलाइन करण्याचा सल्ला दिलाय. विविध बँकांकडून याबाबत दरवेळी ग्राहकांना अलर्ट व अपडेट्स पाठवले जात आहे. बँकांकडून देण्यात येणाऱ्या इंटरनेट बँकिंग आणि इतर ऑनलाइन सुविधांमध्ये हि वाढ झालीय.

या दरम्यान असे असून देखील तुम्हाला एखादे बँकेचे अत्यावश्यक काम असेल आणि ज्याकरता तुम्हाला बँकेच्या शाखेत जाणे गरजेचं असेल, तर बँका कधी बंद आहेत हे जाणून घ्या,. जेणेकरून लॉकडाऊन काळात होणारा खोळंबा टाळता येईल.