TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 26 मे 2021 – टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आहारात टोमॅटो हे प्रत्येक भाजीमध्ये टाकले जातात. भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून हि टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक आढळतात. सध्याच्या कोरोना काळामध्ये टोमॅटोचा रस पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

टोमॅटो रस घरच्या घरी कसा तयार करायचा? हे जाणून घेऊया. हा टोमॅटो रस पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासाठी एक ग्लास पाणी, मीठ, आद्रक आणि दोन टोमॅटो घ्यावे. गरम पाणी करून त्यात मीठ आणि आद्रक मिसळावे. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट बारीक करून घ्यावी. हे मिश्रण साधारण वीस ते तीस मिनिटे गॅसवर ठेऊन गरम करावे. हा टोमॅटोचा रस दररोज आहारात घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्रा देखील भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि ‘व्हिटामिन के’चा खूप उत्तम स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी चांगली आहेत.

टोमॅटोमध्ये कर्बोदकाचे प्रमाण कमी असते. यामुळे हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. त्यामुळे टोमॅटो खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वजन कमी करायचे असेल तर टोमॅटो खावे. एक टोमॅटो खाल्ले तर पोट भरल्यासारखे वाटते.

टोमॅटो खाण्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढते. कारण, टोमॅटोमध्ये 94 टक्के पाणी असते. यामुळे विशेष: उन्हाळ्यात टोमॅटो खाल्ले पाहिजे. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर आणखी प्रभावकारक ठरतो.