TOD Marathi

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विश्वासू आणि सहाय्यक चंपासिंग थापा (Champasing Thapa) यांनी शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून आलेले वामनराव महाडिक यांच्या कन्या हेमांगी महाडिक (Hemangi Mahadik) यांनी देखील शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केला आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे (Uddhav Thackeray Eknath Shinde) ही लढाई सुरू असताना अशा लोकांनी शिंदे गटात प्रवेश करणे हा उद्धव ठाकरेंसाठी धक्का मानला जातो.

हेमांगी महाडिक (Hemangi Mahadik) यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आणि येणाऱ्या काळात सामाजिक क्षेत्रात देखील आपण काम करू अशी इच्छा बोलून दाखवली. याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांचाच हिंदुत्वाचा वारसा आम्ही पुढे नेतोय अशी भावना पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलून दाखवली. काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू आणि सहाय्यक चंपासिंग थापा (Champasing Thapa) यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष सुरू असतानाच मातोश्री आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जवळचा संबंध राहिलेले चंपासिंग थापा आणि शिवसेनेचे (Shivsena) पहिले आमदार वामनराव महाडिक यांच्या कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्री यांच्याशी अतिशय निकटचा संबंध असलेली मंडळी राजकारणात नसतानाही शिंदे गटात जातात, संख्या अशीच वाढत राहिली तर उद्धव ठाकरेंसाठी मात्र ही डोकेदुखी ठरणार आहे.