TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 20 ऑगस्ट 2021 – राष्ट्रीय युवा संघासाठी खेळणारा अफगाण फुटबॉलपटू काबुल विमानतळावरून विमान उड्डाणानंतर त्यातून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हे आता समोर आले आहे, असे स्पोर्ट्स फेडरेशनने गुरुवारी सांगितले आहे. काबुलमध्ये अमेरिकन विमाना चाकांवर चढून बसलेल्या काही लोकांचा व्हिडिओ सोमवारी समोर आला होता. त्यानंतर काही लोक हवेतून खाली पडताना दिसले होते.

मृतांत झाकी अनवरी हा तरुण फुटबॉलपटू होता. अफगाणिस्तानमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणारी जनरल डायरेक्टरेट ऑफ फिजिकल एजुकेशन एंड स्पोर्ट्स ऑफ अफगाणिस्तानने गुरुवारी झाकी अनवरीच्या मृत्यूची बातमी दिली आहे.

या संस्थेने आपल्या फेसबुक पेजवर लिहिले कि, इतर हजारो तरुणांप्रमाणे अनवरीलाही देश सोडायचा होता. पण, अमेरिकन विमानातून पडून त्याचा मृत्यू झाला. तालिबान्यांनी देशाचा ताबा घेतला होता. त्यानंतर हजारो लोकांनी देश सोडला. तर काहीजण तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोमवारी असे व्हिडिओ समोर आले होते. जेव्हा काबुल विमानतळावर लोक विमानात चढण्याचा प्रयत्न करताना धक्काबुक्की करत होते. काही लोक विमानाच्या चाकावर आणि त्याच्या पंखांवर बसले होते.

एक अमेरिकन विमान आपल्या लोकांसह उड्डाण करण्यासाठी रनवे सोडत असताना दिसले. तर लोक अजूनही विमानाच्या मागे धावत होते. त्यातील काही त्याच्या पंखांवर चढले. त्यानंतर एका व्हिडिओत लोक विमानातून खाली पडताना दिसले.

या सी -17 अमेरिकन विमानाच्या चाकांवर मानवी मृतदेहाचे तुकडे चिकटलेले आढळले आहेत. अमेरिकेच्या हवाई दलाचे प्रवक्तेने सांगितले, विमानातून सामान उतरण्यापूर्वी शेकडो लोकांनी त्याला घेरले.

सुरक्षा परिस्थिती सतत बिघडत असल्याने विमानाच्या क्रूने शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तालिबान्यांनी सोमवारी ताब्यात घेतल्यापासून 18,000 हून अधिक लोकांना काबूलमधून बाहेर काढले आहे.