TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 जुलै 2021 – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केलीय. यामधील 43 रिक्त जागांवर उमेदवारांची भरती होणार आहे.

या पदांकरिता अर्ज भरण्याची मुदत 22 जुलै 2021 पर्यंत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ,लवकर पदासाठी अर्ज दाखल करावा. तसेच isro.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन सविस्तर माहिती वाचावी.

पदवी अप्रेंटिसची पदे :

  1. – सिव्हिल इंजिनिअरिंग – 3 पदे
  2. – मेकॅनिकल इंजिनिअरिंग – 1 पद
  3. – कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग – 1 पद
  4. – इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग – 1 पद
  5. – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग – 3 पदे
  6. – इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग – 2 पदे
  7. – फायर टेक्नोलॉजी – 2 पदे

डिप्लोमा अप्रेंटिसची रिक्त पदे :

  1. – सिव्हिल इंजिनिअरिंग – 3 पदे
  2. – मेकॅनिकल इंजिनिअरिंग – 2 पदे
  3. – कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग – 2 पदे
  4. – इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग – 3 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • पदवी अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित ट्रेडमधील इंजिनिअरिंगची पदवी उत्तीर्ण असावी.
  • डिप्लोमा अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेडचा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा डिप्लोमा उत्तीर्ण असावा.

निवड प्रक्रिया अशी असणार :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, शैक्षणिक पात्रतेच्या आधारे पॅनेलने तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार त्यांची निवड केली जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांना जारी केलेल्या नोटिफिकेशनमधून अधिक माहिती मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 जुलै
अधिकृत वेबसाइट- www.isro.gov.in