TOD Marathi

टिओडी मराठी, गोवा, दि. 21 मे 2021 – वाढता कोरोना संसर्ग पाहता गोवा सरकारने देखील 31 मे पर्यंत गोवा बंद असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यातून किंवा परदेशातून गोव्यात येणाऱ्या लोकांना कोविड- 19 चा रिपोर्ट निगेटीव्ह असणे अनिवार्य केलं आहे.

गोवा राज्यात 31 मे रोजीपर्यंत कर्फ्यू वाढवला असून यादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु असतील. याअगोदर गोव्यात 9 मे पासून ते 23 मे पर्यंत कर्फ्यू लावला होता. कर्फ्यूच्या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना सूट दिली होती.

गोवा सरकारने वैद्यकीय सेवेस परवानगी दिली असून किराणा मालाच्या दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सांगितलं आहे. याव्यतिरिक्त रेस्टॉरारंटद्वारे डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. आता 23 मे रोजी संपणारा कर्फ्यू आता 31 मे पर्यंत वाढवला आहे. यावेळीही पूर्वी जारी केलेले कडक नियमच कायम राहतील, असं देखील गोवा सरकारतर्फे स्पष्ट केलं आहे.

गोवा सरकारने कोविड- 19 कर्फ्यूवेळी मेडिकल, किराणा दुकान आणि मद्यपानाची दुकानं सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.