TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 जुलै 2021 – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. मात्र, राजकीय वर्तुळात या लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीका टिप्पणी अद्याप सुरू आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधून टीका केली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनमधून भाजपचे कार्यालय चालत आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.सध्या भाजप अनेकप्रकारे महाराष्ट्रात सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

तसेच सध्या भाजप विरोधी पक्षात असल्याने सतत महाविकास आघाडीवर टीका टिपण्णी केली जात आहे. तर, भाजप देखील केंद्रातील शक्तीचा वापर करून महाराष्ट्रात पडद्यामागून राजकारण करत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना थेट राज्यपाल यांच्या राज भवनावर टीका केली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र दिले आहे. त्याची दखल घेऊन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा राजभवनमधून भाजपचे कार्यालय चालत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. या त्यांच्या टीकेला अद्याप भाजपकडून प्रतिउत्तर आलेले नाही.