टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 जुलै 2021 – भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मोटारीवर अज्ञाताने गुरुवारी दगडफेक केली. या प्रकारावरून भाजप महिला नेत्या आणि आमदार मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर खोचक टीका केलीय.
आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या, जाती फोडून झाल्या – आता वाहने फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू आहे, तसेच त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. आम्ही पडळकर यांच्या पाठीशी आहे, असे त्यांनी नमूद केलं आहे.
या हल्ल्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या मोटारीची काच फुटली आहे. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मड्डी वस्ती येथे घडला असून या हल्ल्यानंतर भाजपधून राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली जात आहे.
पडळकर यांच्या मोटारीवर दगड फेकल्याने मोटारीची काच फुटली आहे. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नाही. मोटारीवर दगड फेकणारा तो व्यक्ती कोण होता? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत पोलीस आयुक्तालयाबाहेर निषेध नोंदवला आहे.
जाती फोडून झाल्या – आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू…!
भाजपा आमदार @GopichandP_MLC यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा जाहीर निषेध !गोपीचंद पडळकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है !@BJP4Maharashtra pic.twitter.com/NaNo8C7V8h
— Meghna Sakore Bordikar (@MeghnaBordikar) June 30, 2021
More Stories
“मतं मागायची असतील तर स्वतःच्या बापाचे नाव वापरा”, – उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर शिंदे गटाची पत्रकार परिषद, वाचा प्रमुख मुद्दे
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपली, ‘हे’ महत्त्वाचे ठराव घेण्यात आले