TOD Marathi

Driving License संबंधितच्या नियमांत आजपासून बदल ; Test साठी पाळावे लागणार हे Rules

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, नवी दिल्ली , दि. 1 जुलै 2021 – सध्या ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नियमांमध्ये बदल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारने लायसन्स बनवण्याच्या प्रक्रियेत तसेच यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली जात आहेत.

सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी अनेक सुविधा ऑनलाईन केल्यात. त्यामुळे घरबसल्या अनेक काम करतात. वाहतूक मंत्रालयाने लायसन्स बनवण्यासाठी एक नियम केलाय. यामुळे आता रजिस्टर्ड ड्रायव्हिंग सेंटर्समधून यशस्वीरित्या ट्रेनिंग पूर्ण करणाऱ्या लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही.

ज्या ड्रायव्हिंग स्कूलमधून व्यक्ती ट्रेनिंग घेईल. ते ड्रायव्हिंग सेंटर पूर्णपणे मान्यताप्राप्त असणं आवश्यक आहे. या सेंटरमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट पास झाल्यानंतर लायसन्स मिळेल. या प्रक्रियेमुळए आरटीओ मध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. ड्रायव्हिंग लायसन्ससाठीचा हा नियम आजपासून लागू झालाय.

ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टची पूर्ण प्रोसेस ऑडिटसाठी इलेक्ट्रॉनिक रुपात रेकॉर्ड केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, ड्रायव्हिंग टेस्टसाठी अशाच ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता दिली जाणार आहे, जे गाइडलाइन्सचे पालन करतील.

या गाइडलाइन्समध्ये ड्रायव्हिंग सेंटर्सकडे जागा, ड्रायव्हिंग ट्रॅक व बायोमेट्रिक सारख्या फॅसिलिटी असणं गरजेचं आहे. ड्रायव्हिंग सेंटर्सनी या नियमांचे पालन न केल्यास त्यांना मान्यता दिली जाणार नाही. तसेच एखाद्याने मान्यता नसलेल्या ड्रायव्हिंग सेंटरमधून टेस्ट पास केली, तरी त्याला लायसन्स दिलं जाणार नाही.